फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम-मंगरुळपीर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी ‘आमदार आपल्या दारी’ ऊपक्रमाअंतर्गत गावोगावी जावुन जनतेशी संवाद साधत गावकर्यांना विविध समस्या जाणुन घेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.मंगरुळपीर तालुक्यातील धोञा येथे जावुन लोकांशी हितगुज केले.लोकहितासाठी मी सदैव काम करण्याचे मत व्यक्त करत मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नसल्याचेही यावेळी सांगीतले.सरकारने ‘मुख्यमंञी माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केली असुन सर्व पाञ महिलांनी वेळेत अर्ज भरुन लाभ घेण्याचेही आवाहन केले.युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन शेतकरी हित जोपासता येइल अशी कामे करण्यात येइल असेही सांगीतले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206