अहमदनगर : अहमदनगर शहरांमध्ये सर्वात एक मोठा विषय म्हणजे खड्ड्याचा… नगर शहरात खड्ड्यांचे मोठ साम्राज्य निर्माण झालय, या खड्ड्यामुळे शहरातील रस्तेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, नगर शहरातील रस्त्यांवरील पडलेल्या या खड्ड्यांमुळे ऐतिहासिक अहमदनगर शहराची ओळख आता खड्ड्यांचे शहर अशी होवू शकते तसेच या खराब रस्त्यांमुळे शहरात चालणे सुद्धा अत्यंत धोक्याचे बनले आहे. परंतु हे सर्व करत असताना ज्यांच्यावर नगरकरांनी जबाबदारी दिली असे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक तसेच पदाधिकारी खड्डे बुजवन्या बाबत आयुक्तांना घेराव घालत आयुक्तांना आंदोलनाचा इशारा देत आहेत, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी शिवसेना महापौर व नगरसेवक यांच्यावर केली आहे.
तसेच अश्या प्रकारे सत्ताधारी शिवसेना काम न करता अंतर्गत गटबाजीमुळे सत्तेच्या विरोधात आंदोलन करणार असेल व एक गट फक्त बघ्याची भुमिका घेणार असेल तर येणाऱ्या काळात शहर विकासासाठी हि धोक्याची घंटा आहे, असे मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी म्हंटल आहे. शिवसेना शिवसेनेतील पदाधिकारी नगरसेवक आंदोलनाचा इशारा देत असतील तर शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा असेही भुतारे यांनी सांगितले सर्व नगरसेवक सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडी यांनी खरेतर नगरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधी मागितला पाहिजे . महाराष्ट्रात सत्तेत मुख्यमंत्री, नगर विकासमंत्री शिवसेनेचे असताना महापौरांना शहरातील रस्त्यांना निधी आणता येत नसेल तर या पदावर बसून काय उपयोग असे खडेबोल भुतारे यांनी सुनावले आहे.
आज या परिस्थितीला खड्डे बुजवणे हा नगर शहरातील रस्त्यांचा पर्याय राहिलेला नसून नवीन रस्ते करणे हा एकमेव पर्याय नगर शहरात उरलेला आहे. त्यामुळे कुठेही राज्यात सत्ता असताना आपल्या मंत्र्यांना मागणी न करता पदाधिकारी शिवसेनेतील नगरसेवक महानगर पालिकेतील आयुक्त अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देतात,.हे चुकीचे आहे त्यामुळे नगर विकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून नगर शहराकरिता नवीन रस्त्यांचा निधी उपलब्ध करून आणावा, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे असे नितीन भुतारे यांनी म्हंटले आहे शिवसेनेकडे आता हिंदुत्व राहिलेले नाही हिंदूंचे संरक्षण सुध्दा शिवसेना करू शकत नाही. अंतर्गत गटबाजीमुळे शहरातली विकास सुध्दा करु शकत नाही. त्यांचेच नगरसेवक आंदोलनाचा ईशारा देत असल्यामुळे नगरकरांनी आता न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न नितीन भुतारे यांनी उपस्थित केला