अहमदनगर : सिद्धटेक दुधोडी रस्त्याने जात असताना बबन मगर यांना आबासो आप्पाजी भोसले यांच्या शॉर्टसर्किटने शेतातील ऊस पेटलेला दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ बेर्डीचे रहिवासी हनुमंत प्रकाश भोसले यांना फोनद्वारे तात्काळ घटनेची कल्पना दिली त्यानंतर हनुमंत प्रकाश भोसले यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन 18002703600 नंबरवरुन ही माहिती कळवली आणि काही वेळातच घटनास्थळी पोलिस पाटील दादासो गणपत भोसले व 150 ते 200 गावकरी घटनास्थळी मदतीसाठी धावले
काही मिनिटांमध्ये गावकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळून आग विझवली त्यामुळे 10 गुंठे क्षेत्र वगळता उर्वरित 50 ते 60 एकर क्षेत्रातील शेतकर्यांचे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीमुळे होण्यापासून वाचले त्यामुळे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी,भांबोरा तसेच ईतर सर्वत्र ठिकाणातून कौतुक होत आहे.
प्रतिनिधी -सुनिल मोरे