अहमदनगर : जिल्हा रुग्णालया मध्ये आग लागून झालेल्या भयंकर अपघाताच्या मुद्यावर राज्य सरकारच्या हलगर्जीपणाच्या निषेधात क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे दिनांक 7/11/2021 रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे कॉम्रेड अविनाश साठे, कॉम्रेड अतुल महानवर, कॉम्रेड संदीप सकट यांसह अनेक सामान्य नागरिक व युवक उपस्थित होते. आरोग्यसेवेच्या खासगीकरणाच्या धोरणांच्या विरोधात आणि जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा विरोधामध्ये या वेळी तीव्र घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण करा, आरोग्यामध्ये नफेखोरी चालणार नाही, प्रत्येकाला मोफत दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यव्यवस्था मिळालीच पाहिजे, आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा द्या, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या घोषणा दिल्या गेल्या.

यावेळी बोलताना कॉम्रेड अविनाश यांनी मांडले की या अशा प्रकारच्या अपघातांच्या मुळाशी आरोग्य सेवेचे खाजगीकरण आहे. भंडाऱ्यामध्ये झालेला अपघात, नाशिक मध्ये झालेला अपघात, मुंबई मध्ये झालेले दोन अपघात अशा अपघातांची मालिका सरकारी हॉस्पिटलमध्ये चालूच आहे, दिखाव्या करता ऑडिट केलं जातं, सुरक्षा उपकरणे लावणार अशा घोषणा केल्या जातात परंतु वास्तवात काहीच अंमलबजावणी होत नाही. हे गेल्या वर्षभरामध्ये पुन्हा दिसून आले आहे. याचे कारण हेच आहे की राज्य सरकारला सरकारी आरोग्य व्यवस्था मोडीत काढायची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाललेली खाजगीकरणाचे उदारीकरणाची धोरणांचा भाग म्हणून सरकार सरकारी हॉस्पिटल कडे दुर्लक्ष करून त्यांना मोडकळीस आणत आहे, जेणेकरून खाजगी हॉस्पिटलाचा धंदा जोरात चालावा. जेव्हा अपघाता सारख्या घटना होतात तेव्हा तात्कालिकरित्या थोडाफार मुद्दा चर्चेत आणला जातो; परंतु मूळाशी न जाता अनेकदा एखाद्या व्यक्तीलाच दोषी ठरवण्याचाच कारभार केला जातो. व्यक्ती निश्‍चितपणे दोषी असू शकतात परंतु सतत होणाऱ्या या अपघातांमागे सरकारी आरोग्य सेवेकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आहे. आज फक्त सुरक्षेकरिता नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये ठिकठिकाणी उत्तम दर्जाची सरकारी हॉस्पिस्टल्स जनतेच्या पैशातून उभी रहावी याकरता आपला लढा उभा केला पाहिजे. यानंतर कॉ अतुल यांनी मांडले की झालेल्या अपघातामध्ये जे मृतक आहेत त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *