यावल तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जि. प. प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका रामेश्वरी अरुण बडगुजर यांचा यावल स्टेट बँक शाखेतर्फे आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सावखेडा सिम शाखेचे व्यवस्थापक कुंभारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी यावल स्टेट बँक शाखेचे अधिकारी तसेच गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल दहिगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकवृंदातर्फे रामेश्वरी बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, शिक्षक पंकज पाटील, किश्वर शिसोदे, सोनाली चौधरी, रामेश्वरी बडगुजर, सोनाली साळुंखे आणि विमल बारेला उपस्थित होते.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन, उपाध्यक्ष आशाताई सूर्यवंशी, सर्व सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
