बुलढाणा : प्रभावी वक्ते, शिवचरित्रकार,व्याख्याते तथा बालपणापासूनच आपल्या प्रखर वाणीतुन शिवप्रभुंच्या चरित्राचा जागर करणारे ह.भ.प. माधव महाराज पाटील, मुळ गाव लासुरा, लहानपणापासूनच महाराजांना अध्यात्माची ओढ लागली, अवघ्या ५ वर्षाचे असतानाच त्यांच्या मनावरती आध्यात्मिक संस्कार व्हायला सुरुवात झाली,दिंडी,किर्तन,कथा,व्याख्यान, थोरामोठ्यांच्या मुखातून श्रवण केल्यानंतर आपण सुद्धा वारकरी होऊन भंगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करावा अशी ईच्छा त्यांच्या मनात आली,त्यानंतर हळुहळु त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाचा प्रचार-प्रसार सुरू केला,९६ कुळी कुटुंबातील जन्म असल्या कारणाने छत्रपती शिवप्रभुंच्या चरित्राचा सखोल अभ्यास त्यांनी केला व त्यातुन काढलेल्या निष्कर्षाला व्याख्यानाच्या माध्यमातून व किर्तनाच्या माध्यमातून समाजापुढे मांडला, प्रखर हिंदुत्ववादी विचारक आणी शिवचरित्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे, तद्वतच क्षण महाराजांनी छत्रपती हेल्प फाऊंडेशन नावाची संघटणा स्थापण करून रक्तदान, मदतकार्य, बचावकार्य आदी कार्यक्रम ते राबवत असतात.त्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार ज्यावेळेस ते मांडतात तेव्हा श्रोत्यांच्या अंगावरती रोमांच उठतात, सद्यस्थितीत आपल्या व्याख्यान,किर्तनाच्या,समाजसेवेच्या माध्यमातून अतिशय कमी वयातच लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणार्या ह.भ.प. माधव महाराज पाटील यांना त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत मनुष्यबळ लोकसेवा अकादमी च्या वतिने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श किर्तनसेवा प्रबोधनरत्न पुरस्कार २०२१ त्यांना जाहीर करण्यात आला, त्यांच्यावरती समाजातुन शब्दसुमनांची उधळण होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *