
बुलढाणा : विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलकापूर च्या वतीने श्री बालाजी मंदिर येथे आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्या चे निमित्ताने तर्पण विधि आयोजित करण्यात आला. आपल्या देशात मुघल,पोर्तुगी,तुर्की,ब्रिटिश यांनी आक्रमण करून देशावर राज्य केले त्यात त्यांच्या शर्ति,धर्म परिवर्तन अश्या गोष्टी ज्या हिन्दू क्रांतीकारी बांधवाना,शेतकरी वर्गास मान्य नव्हत्या.अश्या करोड़ो अनाम हिन्दू बांधव,अयोध्या येथील विवादित ढांचा पाडतांना झालेल्या गोळीबार मध्ये शेकडो लोक मारल्या गेले. चितोड मध्ये हजारो स्त्रीया यांनी जोहर केले ,देशात गौरक्षणा साठी आपले प्राण गमावले अश्या सर्व हिन्दू बांधव व भगीनि ,अनेक जाती संप्रदाय आणि निष्पाप स्त्रिया अबालवृद्ध यांनी राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी प्राणांच्या आहुती दिल्या. अश्या सर्व हिन्दू बांधव व भगीनि ज्यांच्या आत्मास शांति करिता तर्पण करणारे सुद्धा कोणी राहीले नाही .
आपल्या धर्मात प्रत्येक व्यक्ती ला तीन ऋण फेडायची सांगितले आहे त्यांपैकी पितृऋण व देश ऋण या ऋणमुक्ती करिता सर्वपित्री अमावस्या दिनी तर्पण विधिचे आयोजन केले. या तर्पण विधीमध्ये शहरातील गणमान्य लोक सहभागी झाले होते. त्या मध्ये डॉ. विनोद हागे पाटिल, सतीश बंग,राजेश आकोटकर,गिरीश भीमजयाणी, दत्तात्रय निमगवकर,अशोक व्यास,सचिन भंसाली,सुरेश शर्मा,सुनीलसिंह राजपूत,दामोदर शर्मा,श्रीचंद सिवनदास राजपाल,संजय बावस्कर,गजानन कथने अजय गणमान्य तर्पण विधी मध्ये बसले होते.श्री बालाजी मंदिर ट्रस्ट यांनी कार्यक्रमा करिता जागा दिल्या बद्दल व तर्पण विधी कार्य करण्या करिता लाभलेले माधव पानट व गजाननजी जोशी यांचे आभार शिरीष घिरनिकर यांनी मानले.
यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री श्रीकृष्ण तायडे, विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख संमती जैन, विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख गिरीश महाराज घिर्णिकर, विश्व हिंदू परिषद प्रखंड सहमंत्री सचिन देवकर, विश्व हिंदू परिषद शहर उपाध्यक्ष अमोल टप, बजरंग दल शहर संयोजक रामा मेहसरे, बजरंग दल प्रखंड सहसंयोजक पवन राखोंडे, अल्पेश देवी कार, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.