यावर निर्णय न झाल्यास तहसीलदार यांच्याकडे डी.एस.सी.जमा करून काम बंद आंदोलन

 औरंगाबाद : खुलताबाद तालुका तलाठी संघातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी खुलताबाद तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची तातडीने बदली करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. अर्वाच्य भाषेत संबोधन करणार्‍या जगताप यांना पायउतार करावे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष दुबल आप्पा यांना मुर्ख असे संबोधन केल्याने राज्य तलाठी संघाच्या सदस्यांचे मन दुखावले आहे. यावर निर्णय न झाल्यास तहसीलदार यांच्याकडे डी.एस.सी.जमा करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. नैसर्गिक आपत्ती कामे व निवडणुकीची कामे वगळता बुधवार पासून सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.यांचा आंदोलनात सहभाग खुलताबाद तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष सचिन भिंगारे , सरचिटणीस प्रकाश बंड, उपाध्यक्ष वंदना बांगर, कोषाध्यक्ष तुकाराम सपकाळ, बि.एन.गवळी, अनंत शेवतेकर, सतिष जोशी, संजय परदेशी, के,टी.कुबेर, पी.ए.चव्हाण, जे.बी.लोखंडे, लक्षमण जाधव, के.सी.कुलकर्णी, राजेंद्र कराळे, बंडु आव्हाळ, दत्तु शेलार, शिवाजी साळुंके, ए.बी.दांडगे, व्ही.एच.पेहरकर, उज्वला वाघमारे, एस.आर.विटेकर, माधवी हिवरकर, मनिषा कदम व तलाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

N टीव्ही न्यूज मराठी योगेश शेळके खुलताबाद औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *