औसा प्रतिनिधी
औसा: औसा तालुक्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यातील सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात पर्मनंट(कायम) आमदार म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
यामुळे सध्या औसा तालुका आणि लातूर ग्रामीण भागामध्ये एकच चर्चा सुरू आहे.की,सध्या लोकशाहीच्या मुख्य आधारावर प्रत्येक 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या दक्ष नागरिकाकडून गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाते आणि लोकांनी .लोकांकडून ..लोकांसाठी…. चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही…. राज्य होय. या लोकशाहीच्या मुख्य सूत्रा प्रमाणेच आमदार निवडून दिले जातात परंतु पर्मनंट आमदार म्हणजे लोकशाही पद्धतीने हे पर्मनंट आमदार आहेत काय ? सध्या लातूर ग्रामीणचे आमदार हे पाच वर्षापासूनपर्मनंट आमदार आहेत?
अशीही चर्चा सध्या औसा तालुक्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू असून याबाबत नागरिकाकडून याविषयी पर्मनंट आमदार म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे… आणि पर्मनंट आमदार होण्यासाठी नेमकी राजकीय क्षेत्रामध्ये काय शक्कल लढविली जाऊ शकते हे शक्य आहे काय? किंवा सध्या लातूर ग्रामीणचे आमदार असे व्हिडिओ काढण्याचा किंवा कार्यकर्त्यामार्फत सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा काय उद्देश आहे.अशीही चर्चा सध्या औसा तालुका आणि लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ग्रामीणचा बुलंद आवाज, लोकप्रिय, पर्मनंट आमदार म्हणून ,मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा सुरू असून मुख्यत्वे करून हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा काय उद्देश आहे….हे ही न उलगडणारे कोडे असून या व्हिडिओवरून ‘ये पब्लिक है! भाई,सब जानती है!’ अशी चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.