section and everything up until
* * @package Newsup */?> Tag नक्षत्राचे देणं काव्यमंचा२५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा- | Ntv News Marathi

सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड पुणे येथे विविध पुरस्कार वितरण व श्रावणी मैफलीने सोहळा रंगला-*

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ च्या वतीने २५वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व काव्य लेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकता संपन्न झाला.

वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की,”
मौखिकता ही भाषेची मौलिकता असते. भाषेचा बोलीभाषेत वापर होत असतो. तोपर्यंत ती जिवंत असते. भाषेत रसात्मकता येणे गरजेचे असते .भाषेतील ग्रामलय आणि प्रासादिकता यामुळेच भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. हीच भाषेची अभिजातता होय.स्वांत सुखाय वृत्तीमुळे भाषेचे नुकसान होत आहे .भाषा हे संवादाचे माध्यम आहे .म्हणून समाज मनाचे आकलन झाले पाहिजे .शेवटी वेदनेची भाषा एकच असते .त्यामुळे ज्या भाषेतून समाज मन प्रगट होते .अशी कविता सर्वांना भावते.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी संस्थेची स्थापना आणि गेली २५ वर्ष केलेल्या वाटचालीचा आढावा घेऊन. संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती यावेळी दिली. संस्थेचा प्रवास हा प्रेरणादायक आहे. अनेक अडचणींना मात करत संस्थेने ही यशस्वी वाटचाल केली आहे.

कार्यक्रमाच्या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका सौ. डॉ.अलका नाईक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, उद्योजक शिवहर मेरे, ज्येष्ठ साहित्यिक व सूत्रसंचालक श्रीकांत चौगुले, विक्रम मांढरे, वसंत टाकळे, गोविंद जगदाळे , अंजू सोनवणे, संपत नायकोडी, सुधाकर गायकवाड,इ.मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुमंत यांच्या शुभहस्ते कवी नवनाथ पोकळे-बापाची सावली, कवी तुषार डावखर-डोंगर द-याचा मुलुख, कवी अक्षय पवार-उन्हाळ्यातही फुलणारा गुलमोहर तसेच माझ्या मनातील पाऊस -प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले.

यावेळी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. अशोक नगरकर,चिंचवड, निवेदक श्रीकांत चौगुले, सांगवी,कविवर्या वर्षाताई सोमलकर, चंद्रपूर, उद्योजक नितीन शेठ लोणारी, भोसरी,समाजसेवक मिलिंद घोगरे, पुणे, डॉ. तुकाराम रोंगटे, पुणे,समाजसेवक सुभाष वाल्हेकर, चिंचवड, चित्रकार सुहास जगताप , पुणे,यांना शाल, स्मृतिचिन्ह, बुक, गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले.
तसेच उद्योजकांना दिला जाणारा गौरव स्मृती पुरस्कार यावेळेस उद्योजक शिवहर मरे, चिंचवड,उद्योजक विक्रम मांढरे, पुणे यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिकाच्या बद्दल आदर व्यक्त करणारा मानाचा कुसुमाग्रस स्मृती गौरव ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर आणि पुरस्कारज्योतिष शास्त्रामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना नक्षत्र राजज्योतिष फक्त पुरस्कार वसंतराव कुलकर्णी, भोसरी यांना प्रदान करण्यात आला. तसेच समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कवीरत्न पुरस्कार कविवर्य यशवंत घोडे ,जुन्नर यांना प्रदान करण्यात आला.

दरवर्षी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात येते या १८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत प्रथम क्रमांक-अवतरण, मुंबई, द्वितीय क्रमांक-सृजनसंवाद, कल्याण, तृतीय क्रमांक-विश्व भ्रमंती, वसई, दीपस्तंभ-कोल्हापूर इ. इत्यादींना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.

नक्षत्राचं देणं काव्यमंच कार्यकर्त्यांसाठी नक्षत्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावेळी कवी रामदास घुंगटकर, यवतमाळ, कवी चेतन ठाकरे-गडचिरोली, कवयित्री सौ वृषाली टाकळे-रत्नागिरी, कवयित्री डॉ. अलका नाईक-मुंबई, कवी किशोर वरारकर, चंद्रपूर, अँड जयराम तांबे-ओतूर, डॉ. शीलवंत मेश्राम, चंद्रपूर, कवी सुनील बिराजदार-सोलापूर, कवी भाऊसाहेब आढाव, चिंचवड, कवी बालाजी थोरात, चिंचवड, कवयित्री सौ दिव्या भोसले ,दिघी, कवी सुरेशचंद्र चन्नाल, निगडी, कवयित्री सौ रुपाली भालेराव ,आकुर्डी, कवी सतीश कांबळे, सांगवी,‌ कवी बबन चव्हाण, च-होली, कवी प्रशांत निकम, पुणे, यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी २५ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-कवयित्री सौ सीमा शेलार (श्रावणाच्या सरी), द्वितीय क्रमांक कवी अशोक उघडे (श्रावणी किमया), तृतीय क्रमांक श्रीमती मृदुला गोखले, उत्तेजनार्थ क्रमांक नरेंद्र गंधारे इ.नी स्पर्धेत यश संपादन केले.

या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन सौ रुपाली भालेराव, कवी विकास बर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी भाऊसाहेब आढाव यांनी मानले.

कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये जुली यादव, श्याम भगत,शिवबा सोनवणे, प्रकाश दळवी, अंजू सोनवणे, रामदास हिंगे, रामदास अवचार, मनोज कुमार सरदार, प्रा यशवंत गायकवाड, बन्सी गायकवाड, सुनील पोटे,राजा म्हात्रे,हिरामण माळवे, अमोल देशपांडे, शामकांत सोनार, संतोष देशमुख इ.नी पुढाकार घेतला.

सलग सहा तासाचा हा भव्य सोहळा विश्वगीत पसायदानाने संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवी कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी श्रावण व निसर्ग या विषयावरच्या रचना सादर केल्या आणि मैफलीत रंगत आणली. प्रत्येक सहभागी ला विनामूल्य सहभाग देण्यात आला होता. प्रत्येकास गुलाबपुष्प व फोरकलर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशा कार्यक्रमामुळे समाजामध्ये एक सांस्कृतिक व साहित्यिक अभिरुची निर्माण होते अशा भावना उपस्थित त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *