PUNE | बीडमधील गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच पुण्यात घरगुती वादातून पत्नीचा कात्रीनं गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतरच याचा व्हिडिओ पतीनं सोशल मीडियात व्हायरल केला आहे. पुण्यातील खराडी भागात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे.
ज्योती शिवदास गीते असे या खून झालेल्या पत्नीचं नाव आहे. चंदन नगर पोलिसांनी आरोपी पती शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे. ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली आहे.
घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या शिवदास गिते पत्नीच्या गळ्यावर शिलाई मशीनची कात्री चालवत खून केला आहे. खून केल्यानंतर पतीनं तिच्या मृतदेहासोबत आपण खून का केला याची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडिया वरती व्हायरल केला आहे.
#punecrime #Crime #punekharadicrime