हिंगोली : शहरातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या एम ए राज्यशास्त्र विषयांमध्ये सर्व प्रथम आलेल्या कु.शितल रणवीर, तृतीय आलेल्या कु.वंदना वाढवे, तसेच संगणक शास्त्र विभागातील कु.साक्षी बगडीया कु.वैष्णवी वाघ,कु.अपुर्वा साकळे,ओम वामन, आणि सत्यम साहु या विद्यार्थ्यांची नामांकित माहिती -तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल आणि स्पर्धा परीक्षा व व्यावसाय मार्गदर्शन केन्द्राच्या शिवहार आढळकर ,ज्ञानेश्वर घुमणर,यासह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य डॉ ए. आर. लाठी उपप्राचार्य डॉ विलास आघाव,सत्रप्रमुख डॉ आर.आर.पिंपळपल्ले,प्रा.जि.पी.चव्हाण, डॉ ए.बी.गट्टानी, डॉ डी.डी.मस्के,प्रा.आर.डी.केने,प्रा.पोले,प्रा.शेख जुनेद,प्रा.राम शेळके,प्रा.अमितपट्टेबहादुर,प्रा.सचिन पिपरवार, सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.