औरंगाबाद : वाळुज महानगर परिसरातील असलेल्या गरुडझेप अकॅडमी मुख्य शाखा महाराणा प्रताप चोक बजाजनगर येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोविड- १९ चे भव्य लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १५० च्या वर लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

या शिबिरासाठी गरुडझेप अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.परमेश्वर वाकदकर, आरोग्य सहायक राधेश्याम वैष्णव, परिचारिका सरिता सोनवणे यांचे सहकार्य लाभले. आशा सवयंसेवीका विद्या खाकरे, मीरा जाधव तसेच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपसंघटक कांता कैलास चव्हाण आणि मदतनीस म्हणून श्याम साबळे, प्रतीक वारकरी आणि तेजस पिंजरकर यांनी काम पहिले.
गरुडझेपचे अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे यांनी त्यांचा गरुडझेपचे अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. सुरेश सोनवणे लिखित “वाया गेलेलं पोर” कि ज्याने इतिहास घडविला हे पुस्तक देऊन सत्कार केला. या शिबिरासाठी गरुडझेप अकॅडमीचे ब्रांच हेड विजय राठोड, उमेश पाटील, संतोष वाघ, प्रमोद वेळंजकर सर, साहेबराव इंगोले यांनी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.