ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनचे उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन

उमरगा(प्रतिनिधी): नुकत्याच महाराष्ट्रात सार्वत्रिक विधानसभा निवडणूका पार पडल्या असून त्याचे निकालही दि.२३/११/२०२४ रोजी जाहीर झाले. सदरचे निकाल हे अतिशय अनपेक्षित, अनाकलनीय व धक्कादायक असल्याने सबंध महाराष्ट्रातील जनतेतून ‘ईव्हिएम’ मशीनबाबत दाट शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या मतमोजण्या पुन्हा एकदा ‘व्हीव्हीपॅट’च्या आधारे केल्या जाव्यात. तसेच यापुढील काळात निवडणूकांतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि लोकांच्या मनातील ‘ईव्हीएम’बद्दलचा संशय घालवण्यासाठी मतदान हे ‘बॅलेट पेपर’द्वारेच घेतले जावे अशा मागणीचे निवेदन ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनने उपविभागीय अधिकारी, उमरगा यांच्याकडे सादर केले.
या मागण्या वरच्या स्तरापर्यंत पोहोंचवून मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास पुढील काळात लोकप्रबोधन करुन निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनावर ॲड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, ॲड. ख्वाजा शेख, ॲड. अर्चना जाधव, ज्योती माने, प्रदिप चौधरी, किशोर बसगुंडे, संतोष चव्हाण, करीम शेख, बबिता मदने, धानय्या स्वामी, हारुन इनामदार, पुजा माळी, ॲड. एफ. एस. मुल्ला यांसह फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *