PUNE | चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत ‘टुथ अँड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा प्रकार सुरू असताना पीडित मुलीचा फोन सुरू राहिला. मुलीच्या नात्यातील मुलाने हा सर्व प्रकार ऐकला आणि पीडितेच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुलीशी संवाद साधत तिचे लोकेशन मिळवत पोलिसात धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नीट’ ची परिक्षा देण्यासाठी १७ वर्षीय मुलगी पिंपरीमधील सोसायटीत भाड्याने रूम करून राहते. पाच वर्षांपूर्वी पीडित मुलीची आणि एका २२ वर्षीय तरुणीची ‘इन्स्ट्राग्राम’ वर ओळख झाली. मंगळवारी (दि.२१) या तरुणीचा पीडितेला फोन आला. ‘मला घरातून बाहेर काढले आहे. राहण्यासाठी जागा मिळेल का,’ अशी विचारणा तिने केली. त्यानंतर पीडित मुलीने एका दिवसासाठी तिला रूमवर बोलावून घेतले.

मंगळवारी संबंधित तरुणी पीडितेच्या रूमवर आली. मात्र, रात्री मित्राचा फोन आल्याने ती त्याच्यासोबत रावेत येथील फ्लॅटवर गेली. तेथे तिचा मित्र आणि त्याचे दोन साथीदार दारू पित होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास पीडित मुलीने मैत्रिणीला फोन करून, ‘तू कुठे आहेस, घरी ये, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे,’ असे म्हंटले. मात्र, तरुणीने प्रमाणाबाहेर दारूचे सेवन केले होते. त्यामुळे ‘तुला माझी काळजी असेल, तर तूच इकडे ये,’ असे तिने सांगितले. त्यानंतर तरुणीचे इतर दोन मित्र अल्पवयीन मुलीला आणण्यासाठी गेले. कारमधून ते रावेत येथील फ्लॅटवर आले. तेथे गेल्यावर तरुणीने अल्पवयीन मुलीला दारू पिण्याचा आग्रह केला. यामुळे अल्पवयीन मुलगीही दारू प्यायली. पीडित अल्पवयीन तरुणी, तिची मैत्रीण, मैत्रिणीचा मित्र आणि मित्राचे दोन मित्र असे पाच जण दारू प्यायले. दारूची झिंग चढल्यानंतर त्यांनी ‘टूथ अँड डेअर’ गेम खेळायचे ठरवले. या गेममध्ये जो हरेल त्याने समोरचा सांगेल ते करायचे असते. या गेममध्ये पीडितेची मैत्रीण हरली.

 #pune #Crime #CrimeNews #PuneCrime #Rape #TruthandDare #PunePimpriChinchwad 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *