सर्व रस्त्यांचे काम तात्काळ करा,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजु पाटील सुर्यवंशी यांची मागणी.
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या कळमनुरी, माळेगांव ,झरा ,तुप्पा , नवखा, शिवनी, वाकोडी , गौळबाजार ,गागापुर , वाई, तरोडा ,धानोरा,या गावाला तोडणारे सर्व रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून या परिसरातील,गावे हे बाभळी ते येळेगाव (तुकाराम)या गावा लगत असल्याने येथील नागरीकांना दळनवळन तसेच नेहमेच्या कामासाठी हा मुख्य रस्ता असुन देखील या कडे कुठल्याही लोकप्रतिनिधी,जि .प.सदस्य,तसेच बाभळी प.स.सदस्य यांनी या कडे लक्ष दिले नसुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या सर्व रस्त्यांकडे साफ दुर्लक्ष केले असल्याने मागिल दोन वर्षांपासून हे सर्व रस्ते जशाच तसेच असल्याने रस्तावर खड्डे पडल्याने ये जा करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. तसेच संत तुकाराम महाराज संत रामबापु यांच्या दर्शनासाठी या सर्व रस्त्यांवर ये जा करावी लागते. खराब रस्त्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात नेतांना फार त्रास होत असल्याने प्रशासनाने बाभळी ते येळेगाव, बाभळी ते वाकोडी, माळेगांव, झरा, तुप्पा,नवखा, शिवनी, वाकोडी, गौळबाजार, गंगापूर,येहळेगाव तुकाराम या सर्व रस्त्यांची कामे तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष राजु पाटील सुर्यवंशी यांनी केली आहे