हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव , कळमनुरी आणि औंढा नागनाथ येथे खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे दि. १९ व २४ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२१ रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून संबंधित तालुक्यातील दिव्यांग बांधवानी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .
संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघात गरजू दिव्यांग बांधवाना २ कोटी ७७ लक्ष रुपयाच्या साहित्य वाटपाच्या यशस्वी शिबिरानंतर साहित्य आणि प्रमाणपत्रापासून वंचित राहिलेल्या दिव्यांग बांधवांसाठी तालुकानिहाय तपासणी करण्यात यावी आणि त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करावे याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी , सेनगाव, आणि औंढा नागनाथ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले दि. १९ व २४ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर २०२१ रोजी हे शिबीर होणार आहेत . कळमनुरी येथे दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरवात होणार आहे . कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरवात होणार आहे .
तसेच सेनगाव येथे दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११ वाजता तर औंढा नागनाथ येथे १ डिसेंबर २०२१ रोजी ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११ वाजल्यापासून शिबीर सुरु होईल . तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे . यापूर्वी सुद्धा संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघात तपासणी करण्यात आली होती . मतदार संघातील एकही दिव्यांग बांधव साहित्य आणि प्रमाणपत्राशिवाय वंचित राहिला नाही पाहिजे याकरिता पुन्हा एकदा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले .
Skip to content