हिंगोली: मराठवाड्याचे भुमिपुत्र गांधी घराण्यातील अती जवळची नाळ जोडलेली असलेले हिंगोलीचे लोकप्रिय खासदार म्हणून परिचीत असलेले दिवंगत खासदार राजीव सातव यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पंचायत समिती निवडणूक ते लोकसभेचे खासदार असा राजकीय प्रवास करत गल्ली पासुन ते दिल्लीपर्यंत सर्व सामान्य नागरिकांसोबत एक वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे ते लोकप्रिय खासदार म्हणून ओळखले जात त्यांनीं पक्षवाढीसाठी केलीली चळवळ पाहता त्यांना पुन्हा काॅग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या अकाली निधनानंतर हिंगोली जिल्हा पोरका झाला होता. स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी होत होती.आज डॉ प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याभरात कळताच काॅग्रेस कार्यक्रमांनी हिंगोली, कळमनुरी,वसमत, सेनगाव, विवीध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांच्या तोडांत पेढे भरुन जल्लोष साजरा केला.डाॅ.प्रज्ञा सातव ह्या आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करणार असल्याची माहिती काॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडुन बोलले जात असुन डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर उमेदवारी मिळाल्याने हिंगोली जिल्ह्याभरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.