हिंगोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले होते कि जातीयतेढ निर्माण करणारे तसेच कोणत्याही धार्माच्या किंवा समाजा विषयी कोनतिही पोस्ट फार्वड करु नये असे आवाहन केले होते तरी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील “रेणुका माता मित्र मंडळ गृप वर दोघांनी वादग्रस्त, जातीय तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकल्या प्रकरणी दोघांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, पोलीस निरीक्षक उद्यय खंडेराय, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, सायबर पोलीस स्टेशन तथा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली, गोरेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी केली आहे.