SOLAPUR | पुण्याहून आलेल्या एका ४५ वर्षीय विवाहित महिलेने सोलापूर शहरातील एका लॉजमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आणि सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर हे गंभीर आरोप आहेत. लॉजच्या रूममध्ये महिलेसोबत किळसवाणे कृत्य करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सपाटे यांच्याविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणे, विनयभंग आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.