पंढरपूर कॉरिडॉरच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. विठ्ठल मंदिरालगतच्या हेरिटेज वास्तू बाधित होणार असल्याचा दावा करत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विठ्ठल मंदिरालगत अनेक प्राचीन आणि हेरिटेज वास्तू आहेत. मात्र या वास्तू बाधित करून कॉरिडॉर निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शासनाच्या रिकाम्या जागा सरकार बिल्डरच्या घशात घालत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंढरपुरातील स्थानिक नागरिक एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या मूळनिवासस्थान असलेल्या प्राचीन परिसरात हे आंदोलन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *