
अहिल्यानगर, दि. १४/११/२०२५
अहिल्यानगर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अहिल्यानगर शाखेच्या वतीने नगर शहरातील ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अविनाशजी देडगांवकर यांना महत्त्वपूर्ण ‘वीर जीवा महाले कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. श्री. देडगांवकर हे गेली ४६ वर्षांपासून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे व अहोरात्र उल्लेखनीय समाजसेवा करत आहेत. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन नाभिक महामंडळाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
समाजसेवक मा.श्री.अविनाशजी देडगांवकर यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार सोमवार, दिनांक १७/११/२०२५ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा संतसेना सांस्कृतिक भवन, तपोवन मंदिराच्या समोर, तपोवन रोड, सूर्यनगर, अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. नाभिक समाजासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी हा एक गौरवाचा क्षण असणार आहे.
याबाबतची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अहिल्यानगर उत्तर विभागीय सरचिटणीस श्री. विकास मदने यांनी दिली. देडगांवकर यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
