औरंगाबाद : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाळूज महानगर परिसरात सोमवारी दि. ६ ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

सिडको साईनगर येथे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वर्पे, करण साळे व संजय आळंजकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी साहेबराव इंगोले व दत्तात्रय वर्पे यांनी बाबासाहेबांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रल्हाद सूर्यवंशी, विनायक शिंदे, प्रशांत भुजंगे, सुंदर जगताप, राजेंद्र तरटे, अशोक पठारे, प्रदीप जमाले, जनार्दन चिल्लारे, अमोल पोटे, बाबासाहेब आगळे, संदीप ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400