नंदुरबार : शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील कळंबू (ता.शहादा ) शेत शिवारातील अज्ञात चोरांनी ठिबक नळ्या चोरून नेल्याची फिर्याद सारंगखेडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपास कामी पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस आमलदार यांच्यामार्फत तपास चक्रे फिरून चोरांचा शोध घेत असताना रात्री गस्त दरम्यान दिनांक 10 डिसेंबर रोजी आरोपी रमेश शालिग्राम सैंदाणे (वय 40) व त्याच्यासोबत असलेला दामू रामा सोनवणे (वय 60) दोघे रा.वैतागवाडी सारंगखेडा (ता.शहादा) हे मिळून आले असता.त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे जुन्या वापरत्या ठिबक नळ्या 2 बंडल हस्तगत करण्यात आले. तसे सदर चोरी केल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली असल्याचे समजते.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चुनिलाल ठाकरे पो.हे.कॉ.राजू भील पोलीस नाईक रोहिदास सोनवणे यांनी केली आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांना सारंगखेडा पोलीसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या शेतातील शेती उपयोगी साहित्य औजारे वगैरे साहित्य सांभाळून ठेवावे शक्यतोवर शेतात रखवालदार नेमण्यात यावा जेणे करून आपले शेती उपयोगी साहित्य सुरक्षित राहील असे आवाहन सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी केले आहे.
प्रतिनिधी – सुनिल माळी, नंदुरबार