नंदुरबार : जिल्हा पूर्ण आदिवासी बहुल भाग जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये शोषित, वंचित, आदिवासी घटकांसाठी एक सामाजिक ऋण म्हणून काम करणारे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक धाडसी व्यक्तिमत्व, प्रखर पत्रकार म्हणून ज्यांची नाव घेतली जाते नंदुरबार जिल्ह्याची आन-बान शान लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रभारी विजय निकम, लोकशाही मराठी पत्रकार संघ धुळे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन सावळे, यांच्या कार्याची व कामाची दखल घेऊन त्यांचा शहादा पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस अधिकारी म्हनुण ओळख असलेले दीपक बुधवंत यांनी पोलीस स्टेशनमध्ये भव्यदिव्य असा सत्कार करून त्यांच्या पुढील लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पोलीस प्रशासन नेहमीच पत्रकारांच्या सोबत राहून त्यांना न्याय देऊ असे सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेषत: आदिवासींसाठी विजय पाटील, विजय निकम, नितीन सावळे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकारिते बरोबरच सामाजिक कार्याला सुद्धा वाहून घेतलेले आहे त्यांनी अनेक आदिवासी बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केलेले आहे अशा या समाजासाठी वाहून घेतलेल्या पत्रकारांचा सन्मान एका सिंघम पोलीस अधिकाऱ्याने करून त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या यावेळी दैनिक बाळकडूचे शहादा प्रतिनिधी संजय मोहिते, दैनिक पोलीस शोधचे प्रतिनिधी कल्पेश राजपूत, K10 न्यूज मराठी चॅनलचे प्रतिनिधी सुमित गिरासे, NDT न्यूजचे प्रतिनिधी जगन ठाकरे आदी उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी नंदुरबार