फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. अमरावती यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लाप्रवि वाशीम युनिटचे पथक मेहकर येथे हजर झाले व त्यांनी तक्रारदार यांची भेट घेवुन तक्रार घेतली त्यानुसार यातील तक्रारदार हे पेशाने वकील असुन त्यांचे पक्षकार (व नात्याने त्यांचे चुलत आजोबा) यांच्या जमीनीचे फेरफार रदद करण्यासाठीचे कायदेशीर बाबी पाहण्यासाठीचे वकीलपत्र तक्रारदार यांना मिळाले आहे. तक्रारदार यांनी वरीलसंबंधाने दाखल केलेल्या अपीलावर दि. २३.०२.२०२६ रोजी अंतिम आदेश झाला होता. सदर अंतिम आदेशाची मुळ नक्कल प्रत हि आलोसे यांच्याकडे असल्याने व तक्रारदार यांनी त्या आदेशची प्रत त्यांना मागीतली असता लोकसेवक श्री. कैलास मुरकुट, पद सहाय्यक महसुल अधिकारी, यांनी सदर आदेशाची मुळ प्रत देण्याकरीता तक्रारदार यांना २०,००० /- रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशीम घटकाकडे प्राप्त झाली.त्यानुसार दिनांक १६.०४.२०२६ रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता पडताळणी कार्यवाही दरम्यान लोकसेवक श्री. कैलास भगवान मुरकुट यांनी तक्रारदार यांना त्यांचे पक्षकार (व नात्याने त्यांचे चुलत आजोबा) यांच्या जमीनीचे फेरफार रदद करण्यासंबंधाने झालेल्या अंतिम आदेशाची मुळ प्रत देण्यासाठी २०,००० /- रूपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्यास संमती दिल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर येथील प्रस्तुतकार १ यांच्या कक्षामध्ये सापळा कार्यवाही आयोजीत केली असता त्यादरम्यान लोकसेवक श्री. कैलास भगवान मुरकुट, पद- सहायक महसुल अधिकारी, प्रस्तुतकार १ यांनी २०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यावरुन आलोसे श्री. कैलास भगवान मुरकुट, पद- सहायक महसुल अधिकारी, प्रस्तुतकार १ यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


सदरकार्यवाही
श्री.बापू बांगर,पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती,परिक्षेत्र अमरावती. मो.नं. ९०११३२३४२६, श्री. सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती. मो.नं. ९७६४२१०४८५
यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. जगदीश परदेशी, पोलीस उपअधिक्षक, पोहेकॉ नितीन वलारकर, योगेश खोटे, चालक पोकॉ मंगेश देवकाते सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशीम यांनी पार पाडली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो वाशीम येथे दुरध्वनी क्रमांक ०७२५२-२३५९३३ व व्हाटस अप क्रमांक ९९२२६७१०६४ तसेच टोल फ्रि क्रमांक १०६४ यावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशीम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *