फुलचंद भगत
वाशिम:-स्थानिक यशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय मंगरूळपीर येथे वर्ष २०२४- २५ चा बी.एड पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळयात एकूण एकशे चार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच CTET व TET परीक्षेत यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या परीक्षेत एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी यश मिळवत महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत मानाचा तुरा रोवला आहे.

पदवीदान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळाच्या संचालिका प्रियाताई चंद्रकांत ठाकरे हया उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात ही दिपप्रज्वलन तथा विद्यापीठगीताने करण्यात आली. यावेळी बोलतांना प्रियाताई ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, या यशामुळे महाविद्यालयाच्या प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना सामाजिक जबाबदारी व सतत शिकण्याची वृत्ती यावर भर दिला. इतर विद्यार्थ्यांनीही यांच्याकडून प्रेरणा घेउन स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ओमप्रकाश झिमटे, यशवंतराव चव्हाण अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सुनिता गुलवाडे, प्रा. नंदकिशोर गवई, डॉ. विट्ठल होनाळे, प्रा. शितल निलटकर, भागवत टोपले,रामेश्वर ढवळे,अभिषेक सुरटकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विट्ठल होनाळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. नंदकिशोर गवई यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. शितल निलटकर यांनी केले. कार्यक्रमाला बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

