सौ. कविता आंधळे यांना “अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती पुरस्कार” जाहीर

जामखेड प्रतिनिधी
दि 18 मे

अहिल्यानगर
समाजहिताची जाणीव, शिक्षण क्षेत्रातील निस्वार्थ कार्य आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळेच्या उपाध्यक्षा सौ. कविता ईश्वर आंधळे यांना प्रतिष्ठेचा “अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
महाराष्ट्र श्रम कामगार संघटना (रजि.) पुणे यांच्या वतीने आयोजित “भारत श्री कार्य गौरव सोहळा – पुणे २०२६” या भव्य पुरस्कार सोहळ्यात सौ. आंधळे यांचा गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येत आहे.
सौ. कविता आंधळे यांनी शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड, महिलांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे कार्य आणि सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग यामुळे त्या समाजात विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
या पुरस्कारामुळे श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळा तसेच संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटरच्या कार्याला नवे बळ मिळाले असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली.
हा गौरव सोहळा रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झाला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन सौ. कविता आंधळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ईश्वर आंधळे, रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
“कार्य सन्मान… राष्ट्राचा अभिमान!” या घोषवाक्याला साजेसा हा पुरस्कार समाजकार्यात निस्वार्थपणे झटणाऱ्या व्यक्तींना नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *