१५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला मुंबई तिरंगामय झाली आहे. मंत्रालयासह शहरातील प्रमुख शासकीय इमारती तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंत्रालयावर करण्यात आलेली तिरंगी रोषणाई लक्षवेधी ठरत असून, मुंबईच्या वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसून येत आहे.
