औरंगाबाद : बेगमपुरा पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस जाणाऱ्या दुचाकी गुन्ह्यांचा तपास व प्रतिबंध करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गुप्त बातमीदाराच्या बातमीवरून संशयीत मोहम्मद हुसैन मोहम्मद गौस, वय 22 वर्ष, रा. संजयनगर, बायजीपुरा, आरिफ सय्यद अहमद सय्यद, वय – 20 वर्ष, रा. बुढ्ढीलाईन औरंगाबाद यांना ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबूली दिली.


या मध्ये चोरलेल्या एकूण 5 दुचाकी एकूण 1,60,000 रुपये किंमतीच्या काढून दिल्या. सदर आरोपितांना अटक करण्यात आलेली असून त्यांचेकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगीरी पो.स्टे. बेगमपुरा चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, पोउपनि विनोद भालेराव, विशाल बोडखे, पोना हैदर शेख, पो.ना. मनोरे, नजन, सपकाळ, ठाकूर यांनी केलेली आहे.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *