अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांच्या विश्वासावर नावलौकिक निर्माण करणाऱ्या ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’च्या कर्जत शाखेचा प्रथम वर्धापन दिन मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
दर्जेदार उत्पादने आणि तत्पर सेवेमुळे ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’ने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रथम वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री. महादेव सुरवसे, कंपनीचे सीईओ प्रा. राम काळे सर आणि व्हा. चेअरमन श्री. मच्छिंद्र गव्हाणे यांनी सर्व ग्राहक, हितचिंतक आणि वितरकांचे मनःपूर्वक आभार मानले.
ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला खंबीर पाठिंबा यामुळेच संस्थेला अल्पावधीत प्रगती साधता आल्याची कृतज्ञता व्यवस्थापनाने व्यक्त केली. गुणवत्तेशी तडजोड न करण्याच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘एम. प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज’चे नाव आदराने घेतले जात असल्याचेही सांगण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त ग्राहक आणि हितचिंतकांकडून उद्योगाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि पसंती कायम ठेवण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.
