मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नेपाळपासून पटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि मदत करण्यात आली.
महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी भाविकांच्या रेल्वे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी रेल्वे क्रमांक १७६०९ ने पटणाहून नागपूरकडे सर्व १०६ भाविक सुखरूप रवाना झाले.
संकटाच्या काळात तातडीने मदत आणि आवश्यक समन्वय केल्याबद्दल सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केले.
