मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवघा येथे दोन युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांनी केली.
अतिवृष्टी आणि विविध नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही आंदोलक युवकांनी केली आहे.
अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीचा गांभीर्याने विचार करून हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन आंदोलकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
