गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील दामपूर येथे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट क्रिडा सामन्यांच आयोजन करण्यात आले. सदर आयोजीत सामन्यांमध्ये पहीला, दुसरा व तिसरा असे तिन पुरस्कार देण्यात येणार आहे.

या क्रिडा सामन्यांचे काल २४ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. तर सह उद्घाटक म्हणून माधुरीताई उरेते जि.प.सदस्या गडचिरोली, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी चुटूगुंटा ग्रामपंचायत चे सरपंच साधनाताई मडावी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज कुमार अवधेशराव बाबा आत्राम, सुरेशभाऊ आत्राम उपसरपंच चुटुगुंटा ग्रामपंचायत, या वेळी गावातील सर्व ग्रामस्थानिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *