यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीचा फायदा घेत दोन घरातील रोकडसह मोबाईल लंपास केल्याची घटना आज शनिवार, दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी दत्ता चंपत कांबळे रा.विठाळा यांच्या घरातील परिवार सर्व जण दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी ९ वाजता जेवण आटोपून आपआपल्या घरात झोपी गेले होते. दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीचा फायदा घेत फिर्यादीचा घरातील लोखंडी पेटीत कापूस विक्रीतील २० हजार रुपये तसेच शेजारी कलाबाई पांडुरंग देडे रा.विठाळा हिच्या घरातील खुर्चीवर ठेवलेल्या पर्स मधून २२ हजार व घरातील सॅमसंग मोबाइल अंदाजे किंमत ५ हजार असा मिळून एकून ४७ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.२५ डिसेंबर सकाळी ७ वाजता उघडकीस आली असून मध्यरात्री दोन अज्ञात इसम गावात दुचाकीने फिरत असल्याने येथील माजी सरपंच अनिल कसणदास चव्हाण रा.विठाळा याने त्यांना विचारणा केली असता अज्ञात चोरटे दुचाकी सोडून पसार झाले.माजी सरपंच याने त्यांना हटकले नसते तर दुचाकी लंपास झाली असती हे मात्र निश्चित..! या प्रकरणी दिग्रस पोलिसात फिर्यादी दत्ता चंपत कांबळे याने तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहकारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *