दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उप पोलिस ठाणे अंतर्गत दि. 31/12/2021 मा. पोलीस अधीक्षक श्री.अंकित गोयल मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांच्या संकल्पनेतुन तसेच मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली पोलिस दादलोरा खिडकी या योजने मार्फत उप पोलिस ठाणे रेगुंठा हद्दीतील 25 अंध लोकांना प्राणहिता पोलीस मुख्यालय अहेरी येथे ऑपरेशन रोशनी अंतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे डोळ्यांच्याआजारावरील ऑपरेशन उपचार करण्याकरिता गडचिरोली पोलीस दल व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागातील अंध लोकांवरती दवा उपचार करण्याकरीता ऑपरेशन रोशनी योजना या योजनेअंतर्गत उप पोलीस ठाणे रेगुंठा हद्दीतील 25 अंध लोकांना सावंगी मेघे वर्धा येथे पाठविण्यात आलेले होते त्या *सर्व 25 अंध लोकांचे यशस्वीरित्या ऑपरेशन रोशनी अंतर्गत ऑपरेशन करण्यात आले असून ऑपरेशन यशस्वीरित्या झाल्याने नविन दृष्टी मिळाली सदर ऑपरेशन करीता पोलीस ठाणे रेगुंठाचे पोलीस अंमलदार सुरेंद्रकुमार भगत व महिला पोलीस अंमलदार रोहिणी गोटे हे उपस्थित राहून ऊतम कामगिरी केली
भास्कर फरकडे
एन.टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली