सांगली : 31 डिसेंबर आणि नियोजीत आज रोजी चव्हाणकॉलनी या भागात पालक मेळावा व दूधपार्टी नियोजन करण्यात आले, या मध्ये मोबाईल च्या अतिवापराचे दुष्परिणाम, बदलती कुटुंब व्यवस्था, आणि मुलामुलींच्या पौगंडअवस्था व पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. सचिन कापसे, श्री झाकीर फकीर सर, श्री महादेव झांबरे गुरुजी यांनी उपस्थित लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले

सूत्रसंचलन श्री नायकवडी सर यांनी केले, स्वागत व प्रास्ताविक श्री. अनिल फाळके सर व आभार डॉ. सतीश बापट यांनी मानले. आज खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग जुळून आला या कार्यक्रमासाठी चव्हाणकॉलनी मधील 150-200 लोक उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे पालकांना त्यांच्या मुलांबाबत घ्यावयाची काळजी तसेच 31 डिसेंबर ला दारू ढोसून, फटाके फोडून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना एक वचक बसवण्याचं काम या समितीने केल्याचे समाधान उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं. कार्यक्रमा चे नियोजन ॲड. मोहन पाटील व मित्र परिवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *