यावल येथील जे. टी. महाजन स्कूलमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या बैलांचे पूजन, नैवेद्य आणि विद्यार्थ्यांच्या शेतकरी वेशभूषेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाला दिपाली धांडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. प्राचार्या रंजना महाजन आणि पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे यांच्या हस्ते मातीच्या बैलांचे पूजन करून नैवेद्य अर्पण करण्यात आला.
यावेळी सुजाता पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोळा सणाबद्दल माहिती दिली. तसेच Sr. Kg इंग्लिश मिडीयमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही पोळा सणाची माहिती सांगितली. काही विद्यार्थ्यांनी शेतकरी पोशाखात सजून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बडगुजर यांनी केले, तर डिंपल इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
