यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटील यांना त्यांच्या कार्याची दखल घेत दैनिक नवराष्ट्र नवभारत ग्रुपच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१२ सप्टेंबर हा त्यांचे पती, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी छायाताई पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी छायाताई पाटील यांच्या कार्यात अधिकाधिक भर पडावी आणि आगामी विकासकामांमध्ये त्यांनी नेहमी अग्रेसर राहावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. समाजभूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याने छायाताई पाटील यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *