यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला गावठी बनावटीच्या देशी पिस्टलसह अटक केली. त्याच्याकडून पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे आरोपी, गुन्हेगारांचा शोध आणि गुंगीकारक औषधद्रव्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
19 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागातील पोफाळी हद्दीत असताना तरोडा फाटा, पुसद-उमरखेड रोडवरील हॉटेलजवळ एक इसम गावठी पिस्टल घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.
पोलिसांनी पंचांसह कारवाई करून शेख अरबाज शेख रोशन, वय 23 वर्षे, रा. वरुड, ता. पुसद, जि. यवतमाळ याला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये सुमारे 30 हजार रुपयांचे गावठी देशी पिस्टल आणि 1 हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस आढळून आले. एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील, पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि अमोल राठोड, पोउपनि सुरेश शिंदे, सफौ मुन्ना आडे, सफौ संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चोपाशि राजेश जाधव, सफौ प्रल्हाद राठोड आणि पोहवा प्रभाकर जाधव यांचा सहभाग होता.
