यावल येथे भारतीय स्टेट बँक शाखेच्या वतीने माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळांमधील उपक्रमशील व कर्तव्यदक्ष शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षकांना गौरविण्यात आले.

भारतीय स्टेट बँकेच्या संयुक्त विद्यमाने गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, धर्मेंद्रजी कुमारसिंग क्षेत्रीय प्रबंधक जळगाव आणि SBI शाखाधिकारी राधेश्याम मुंगमोळे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंजुश्री गायकवाड, शिक्षक नेते पी.एस. सोनवणे, केंद्रप्रमुख महम्मद तडवी, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक श्रीकांत मोटे, विनोद सोनवणे, एम.के. पाटील मुख्याध्यापक, दिपक सराफ, आरिफ तडवी मुख्याध्यापक तसेच SBI शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

यावल तालुक्यातील दहिगाव केंद्रातील आदर्श कलाशिक्षक संतोष वानखेडे सर, कोरपावली; अजय पाटील सर, दहिगाव; आरिफ तडवी सर, कोरपावली; मुख्याध्यापक प्रमिला सचिन धालपे, वढोदे; दिपक चव्हाण, मानवेल; धिरज तायडे, सौखेडासिम; राहुल जावळे, हरिपुरा आश्रम शाळा यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन धालपे सर आणि वसंत सोनवणे सर यांनी केले. आभार SBI शाखाधिकारी राधेश्याम मुंगमोळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *