अहमदनगर : स्त्रीयांना शिक्षण देण्याचे कार्य त्या काळात सुरु झाल्याने आज स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला आहे. हा सन्मान फुले दामप्त्यांमुळे मिळाला. सावित्रीबाईंचे कार्य समाजपयोगी आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी केले.
ओबीसी, व्हीजे,एनटी जनमोर्चाच्या नगर शहर जिल्हा शाखेच्यावतीने क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची 91 वी जयंती संत सावताश्रम शिक्षण मंडळाच्या माळीवाडा येथील महात्मा फुले विद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.राठोड बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते. विद्यालयाचे चेअरमन व नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रा.संजय जाधव, समता परिषदेचे अध्यक्ष दत्ता जाधव, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, भिंगार अर्बन बँकेचे संचालक विष्णूपंत फुलसौंदर, माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के, परेश लोखंडे आदि उपस्थित होते. माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले, स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घातला म्हणून आज स्त्रीयांना शिक्षणाची दारं उघडी झाली. प्रत्येक स्त्रीने शिक्षणाचा लाभ घेऊन किमान स्वत:चा आणि परिवाराचा विकास करावा, असे आवाहन केले. स्त्री शिक्षणातून समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण करण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी केला. आज स्त्रीया शिक्षणात पुढे आहे आणि कर्तुत्वातही त्या मागे नाहीत. यातूनच सुसंस्कृत समाज निर्माण होईल आणि समानता सर्वत्र असेल, असा विश्वास माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केला.
जीवनसाथी या शब्दाचा अर्थ सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रातून सिद्ध होतो. प्रवाहाच्या विरोधात जावून अनिष्ठ प्रथा नष्ट करण्यासाठी ज्योतीरावांनी जे प्रयत्न सुरु केले होते, त्याला सर्वप्रथम सावित्रीबाईंनी साथ देऊन पत्नीधर्म निभावला, पुढे ती चळवळ स्वत:ची समजून सावित्रीबाईंनी पुढे नेली म्हणून वंचित स्त्रीयांना शिक्षण मिळणे सुरु झाले. ते आजही सुरु आहे, असे पत्रकार राजेश सटाणकर यांनी सांगितले. प्रारंभी जनमोर्चाच्या राज्य महिला उपाध्यक्षा सौ.वनिता बिडवे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. विष्णूपंत फुलसौंदर यांनी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा माळीवाडा येथे बसवावा, अशी मागणी केली. महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना निवेदन देऊन मागणीचा पाठपुरावा करु, असे अध्यक्षीय भाषणात श्री.भुजबळ यांनी आश्वासन दिले. जनमोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई तांबोळी, छाया नवले, साविता घायताडक, रमेश सानप, शशिकांत पवार, रमेश बिडवे, विनोद पुंड, संजय आव्हाड, संजय सागावकर, श्री.भुतारे, हर्षल म्हस्के, अनिल इवळे, यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी जयंती उत्सवात सहभागी होते. शेवटी विष्णूपंत म्हस्के यांनी आभार मानले.