हिंगोली : भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर जिल्हा प्रभारी पदी व युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांची भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे,
हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे चिरंजीव जिल्ह्यातील मौजे आडगाव एका ग्रामीण भागातील रहिवासी असून त्यांनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य ते युवा मोर्चा परभणी जिल्हा प्रभारी पदावर केलेल्या कामाचा लेखाजोखा पाहता भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस राहुल भैया लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा लातूर जिल्हा प्रभारी पदी शिवाजीराव मुटकुळे यांची निवड पाच जानेवारी रोजी मुंबई येथील युवा मोर्चा प्रदेश कार्यालयात नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आली
या निवडिबद्दल हिंगोली जिल्ह्याभरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, तालुका सरचिटणीस श्रीरंग राठोड, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हिमत राठोड, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विजय धाकतोडे पाटील, युवा नेतृत्व गजानन घोगरे, दिग्विजय खाडे, सुरज वीटकरे, वैभव कोटकर, रामदास कोकाटे, शाहरुख पठाण, शुभम खाडे, गजानन कराळे, धनंजय कराळे आदींनी अभिनंदन केले.