सांगली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात 5 हजार 299 बेडस् तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार 200 बेड आयसीयूचे, 3 हजार 638 ऑक्सिजनचे बेडस् आणि 461 हे सर्वसाधारण बेडस् आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. डिसेंबर महिन्यात आठवड्यात 40 ते 50 रुग्ण कोरोनाचे आढळत होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत 134 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 298 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैकी केवळ 176 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. बाधित 122 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपचारासाठी खासगी आणि सरकारी रुग्णालये तयार ठेवली आहेत. त्याठिकाणी लागणार्‍या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल वाडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *