राहुल वाडकर…
सांगली :- अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तो त्रास बंद करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी यल्लाप्पा उर्फ यलगोंडा चंद्रकांत कोळी (रा. बेडग) आणि एका महिलेविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यल्लाप्पा याने या महिलेशी संगनमत करून पीडितेची अश्लील चित्रफीत तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविली. तसेच ती चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करून त्रास बंद करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली. संबंधित महिलेमार्फत खोट्या केस दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे पीडितेच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.