पालघर : इंडियन डेंटल असोसिएशनच्या उदघाटन प्रसंगी खासदार गावित यांनी डॉक्टरांना परमेश्वराची उपमा देऊन स्तुती केली .कोरोना महामारीच्या काळात लोकांचा विश्वास फक्त डॉक्टरांवर होता.

तंबाखुमुळे उद्भवणारा कॅन्सर हा महाभयानक आजार हा दातांशी निगडित असल्याने सरकार व इंडियन डेंटल असोशियन यांच्या मार्फत डेंटल असोशियनचे प्रश्न संसदीय अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व खासदार यांच्या मार्फत मांडण्याचा प्रयत्न करून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या अधिवेशनात मुद्दे उपस्थित करेन असे प्रतिपादन खासदार गावित याने मांडले. ह्या वेळी इंडिअन डेंटल असो. अध्यक्ष डॉ प्रसाद पाटील, सचिव डॉ अक्षय अश्विनी, डॉ, खंडेलवाल, कमला लाईफ चे संचालक तसेच पालघर जिल्हातील सर्व डेंटिस्ट ह्यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *