चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन क्रीडा स्पर्धेत “कराटे अँड फिटनेस क्लब मूल” च्या दोन खेळाडूंची निवड अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेकरिता झाली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे शिक्षण घेत असलेला नावेद पठाण याची निवड वूशू या खेळाकरिता 75+ मुले या वजन गटात झाली असून ही स्पर्धा “महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) येथे 24 मार्च 2022 रोजी पार पडतील. तर प्रतिभा महाविद्यालय, मूल येथे शिक्षण घेत असलेली साक्षी गुरनुले हिची निवड कराटे या खेळात -68 की,ग्रा.(मुली) या वजनगटात झाली आहे ही स्पर्धा कुरुक्षेत्र विद्यापीठ,कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे 14-17 मार्च 2022 दरम्यान पार पडेल. होणाऱ्या या अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेत नावेद आणि साक्षी हे आपापल्या खेळ आणि वजनगटात गोंडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करतील.दोन्ही खेळाडुंना कराटे अँड फिटनेस क्लब मूल चे संचालक प्राशिक्षक इम्रान खान तसेच निलेश गेडाम यांचे प्रशिक्षण लाभले आहे. तर दोन्ही महाविद्यालयातील प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांचे खेळाडूंनी आभार मानले आहे.
