चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल शहर व ग्रामिण च्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण तालुक्यातील कामगार बांधवाना श्रमिक कार्ड चे मोफत ऑनलाईन नोंदणी व लॅमीनेशन सहित कार्ड वितरणाचे कार्य सामाजिक उपक्रम म्हणून शिवाजी महाराज जयंती निमित्य दिनांक १९-०२-२०२२ ला दुपारी २.०० पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय चंद्रपूर रोड मूल येथे प्रारंभ झालेला आहे….


सदर उपक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातील शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन चा कार्यक्रम बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री सुमीत सुरेशराव समर्थ , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जे जेंगठे, महासचिव ज्ञानेश्वर वाघमारे , जेष्ठ नेते निपचंद शेरकी तालुका महिला अध्यक्ष नीताताई गेडाम ,प्रा. प्रभाकर धोटे, विनोद मानापुरे,ह्यांच्या हस्ते पार पाडण्यात आला ! सदर उपक्रम सप्ताह म्हणून दिनांक १९.०२ .२०२२ ते २५ .०२.२०२२ पर्यंत होत आहे !सदर सप्ताहात दुपारी २.०० ते रात्रौ ८.०० वाजेपर्यंत उपक्रम राबविला जाणार आहे ! तरी सर्व मूल तालुक्यातील महिला भगिनी व पुरुष बांधवांनी सदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सदर निशुल्क राबवित असलेला श्रमिक कार्ड नोंदणी व कार्ड वितरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा ! असे समस्त मूल शहरातील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांनी केले !
राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर योजनाची माहिती चे पत्रिका तळागळातील मूल शहरातील संपूर्ण घरा – घरात जनतेपर्यंत पोहचवून कामगार बांधवाना लाभ मिळवून देण्याकरिता सतत अहोरात्र प्रयत्न करत आहेत ! जनतेची सेवा हीच गुरुसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन उद्धिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे ! सदर उपक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. किसन वासाडे, मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुका अध्यक्ष निता गेडाम , महिला शहर कार्याध्यक्ष सौ. भाग्यश्री तागडे , मूल तालुका युवक अध्यक्ष समीर अल्लुर वार, नंदू बारस्कर , तालुका महासचिव ज्ञानेश्वर वाघमारे ,प्रा प्रभाकर धोटे, दुशांत महाडोळे, हेमंतजी सुपणार ,शहर सचिव प्रदीप देशमुख, सतीश गुरनुले, साईनाथ गुंडोजवार, निकेश भडके ,संदीप तेलंग, अविनाश कोल्हे, संदीप धारने, बालाजी लेनगुरे , विनोद गुज्जनवार, किशोर पेटकुले मारोती रोहिने ह्यांनी परिश्रम केले.