चंद्रपूर : आज दिनांक १९ फेब्रुवारी२०२२ ला शिवजयंती निमित्त पंचायत समिती मूल येथे शिक्षक कला मंच मूलच्या वतीने सकाळी ९:०० वाजता शिवचरित्रावर आधारित काव्यवाचन तसेच शिवाजी महाराजांवर आधारित तथा देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . उदघाटनाला भेजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मान. गजेंद्र कोपुलवार , महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण सोयाम ,बालविकास प्राथमिक शाळा मूलच्या मुख्याध्यापिका मान. सुनीता बुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंतीच्या शुभ पर्वावर छत्रपतींना पुष्पहार अर्पण करीत दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले . तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व नागरिकांच्या उपस्थितीत अनेक शिक्षकांनी आपल्या स्वरचित कविता व देशभक्ती आणि स्फूर्ती गीताचे गायन केले . कवी म्हणून सुनीता बुटे , रजनी रामगिरवार, कविता रोकमवार , भाग्यलक्ष्मी रणदिवे , प्रमोद मडावी, परमानंद जेंगठे , लक्ष्मण खोब्रागडे, नागेंद्र नेवारे , सुनील खंडारे , प्रतिभा नगराळे आदींनी स्वरचित कविता सादर केल्या . तर विद्या कोसे, सिंधू गोवर्धन , चंदा गेडाम, सुनील निमगडे, डॅनिअल देवगडे, जगदीश गेडाम आदींनी आपल्या सुरेल आवाजात देशभक्ती व स्फूर्ती गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण खोब्रागडे , प्रास्ताविक विद्या कोसे तर आभार लक्ष्मण सोयाम यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व मान. किशोर उरकुंडवार , रत्नमाला गेडाम, उत्तम गोवर्धन,चंदन बिलवने,लखन साखरे,माणिक पाटेवार,कैलास कोसरे , केदार सोनूले , नितीन खाडीलकर , छत्रपती देशमुख, गीता मेश्राम, वैशाली महाकाळकर, फुलचंद गोंगले,आदींनी परिश्रम घेतले तसेच बहुसंख्य नागरिक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर ( सतीश आकुलवार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *