नंदुरबार : शहापूर तालुक्यातील वडाळी येथे कै. कमलबाई श्रीराम माळी यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दि.2 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईफ केअर हॉस्पिटल येथे होणार आहे. या शिबिराला शहादा ब्लड बँक व गावकऱ्यांच सहकार्य लाभले आहे. रक्तदान शिबीरास गावकऱ्यांसह, सर्व समाज बांधव व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार(सुनिल माळी) प्रतिनिधी